*कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांमधील विद्युत त्वरीत दुरुस्ती करा..*
—————————————————-
*माजी पंचायत समितीचे सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम* यांच्या नेतृत्वात अहेरी तालुका मधील पेरमिली परिसरात येत असलेले मौजा – कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांमधील विद्युत दुरुस्तीचा काम त्वरीत सुरू करून, पुन्हा सुरळीत विद्युत सेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन *विद्युत वितरण कंपनी आलापल्लीचे – कार्यकारी अभियंता* यांना देण्यात आला.
यावेळी निवेदन देवून, कार्यकारी अभियंता यांना सांगण्यात आले की, दिनांक ३०/०७/२०२६ रोजी असलेले मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मौजा – कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांकडे जाणारा विद्युत लाईन मधील विद्युत खांबे मोडलेले आहे. त्यामुळे कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांमध्ये मागील १७ दिवसापासून विद्युत सेवा बंद आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे विद्युत खांबे मोडल्यामुळे विद्युत सेवा बंद आहे. म्हणुन सुरुवातील गावकऱ्यांनी पेरमिली क्षेत्रातील विद्युत सेवक यांना माहिती देण्यात आला होता. तेव्हा विद्युत सेवकांनी गावकऱ्यांना म्हणाले की २ ते ३ दिवसात विद्युत दुरुस्तीचा काम करून देतो असे म्हणता म्हणता एक आठवाडा निघुन गेला. त्यानंतर त्यांचे वरिष्ठ म्हणजे त्या क्षेत्राचे कनिष्ठ अभियंता यांना दिनांक – ०९/०८/२०२६ रोजी विद्युत दुरुस्तीचा काम लवकर पूर्ण करण्यासाठी माहिती देण्यात आला. कनिष्ठ अभियंता यांनी शुद्ध हो टेकेदारांना सांगुन मी लवकरच विद्युत दुरुस्ती काम पुर्ण करून, पुन्हा विद्युत सेवा सुरळीत सुरु करून देतो असे म्हणाले. पण काम केलेच नाही. त्यानंतर पुन्हा २ ते ३ दिवसानंतर फोन करून विचारणं केल्यास आज करतो, उद्या करतो. असे म्हणत होते. सोबतच विद्युत सेवक यांना विचारल्यास ट्रॅक्टर मिळत नाही, काम करायला लेबर मिळत नाही असे बहाणे सांगत तब्बल १७ दिवस झाले परंतु कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांमधील विद्युत दुरुस्तीचा काम झालेच नाही असे कार्यकारी अभियंता यांना सांगण्यात आले.
तेव्हा कार्यकारी अभियंता यांनी म्हणाले की, मी आज, उद्या या दोन दिवसात कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा या गावांमधील विद्युत दुरुस्तीचा काम पुर्ण करून, पुन्हा सुरळीत विद्युत सेवा सुरू करतो असे म्हणाले.
तसेच यानंतर पुन्हा विद्युत दुरुस्तीचा कामासाठी एवढे दिवस लागणार नाही याची मी शब्द देतो असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हणाले.
यावेळी निवेदन देताना, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, राष्ट्रवादीचे अहेरी तालुक्याचे अध्यक्ष – नागेश मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव – कैलास कोरेत, आरेंदा चे सरपंच – व्येकटेश तलांडी, सुरज जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – वारलू तलांडी, सलीम शेख, विनोद येरमे, शाकीर शेख, साई राजाराम कुमरे, राजा रहीम शेख, पोचा गावडे, झुरू कुळमेथे, मगरु कुळमेथे, सुधाकर कुळमेथे, महारु गावडे, सुधाकर आत्राम, सुनील नैताम इत्यादी उपस्थित होते.
