एटापल्लीतील शाळाबाह्य मुलांना ‘एकल विद्यालय अभियाना’चा आधार; जिवनगट्टा येथे शिक्षणाची गंगा
एटापल्ली (गडचिरोली): गिरीश नरोटे
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मौजा जिवनगट्टा व परिसरात ‘एकल विद्यालय अभियान’च्या माध्यमातून शाळाबाह्य लहान-मोठ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कौतुकास्पद कार्य गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जे बालके विविध कारणांमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत थेट पोहोचून त्यांना साक्षर करण्याचे काम या अभियानाद्वारे केले जात आहे.
दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचा पाया मजबूत व्हावा, या उद्देशाने हे एकल विद्यालय चालवले जात आहे. या उपक्रमात स्थानिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभत आहे:
आचार्य (शिक्षिका): सौ. पायल विनोद मट्टामी मॅडम (विद्यार्थ्यांना घडवण्याची व प्रत्यक्ष शिकवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.)
संच प्रमुख: श्री. दीपक कातलामी
आंचल प्रमुख: श्री. महेश बुरमवार
या अभियानामुळे जिवनगट्टा आणि संच (एटापल्ली) परिसरातील अनेक गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवीन दिशा मिळत असून, स्थानिक पालकांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले जात आहे.
