*भव्य दहीहंडी स्पर्धेत गोंडवाना सी.सी. व्येंकटरावपेठा संघाला ₹५१ हजारांचे पारितोषिक…!!*
प्रतिनिधी तिरुपति मडावी
अहेरी : श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती, अहेरी तथा बजरंग दल, अहेरी जिल्हा यांच्या वतीने विश्व हिंदू परिषद स्थापना दिनानिमित्त भव्य दहीहंडी स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेतील ₹५१,०००/- रुपयांचे पारितोषिक मा. डॉ. श्री. धर्मरावबाबा आत्राम, आमदार अहेरी विधानसभा यांच्या वतीने देण्यात आले.
दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या गोंडवाना सी.सी. व्येंकटरावपेठा संघाला मा. श्री. हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते ₹५१ हजारांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक व दहीहंडीप्रेमी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडली.
