विठ्ठल-रुक्माई विवाह सोहळ्यानिमित्त भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतले विठ्ठल-रुक्माईचे दर्शन; पूजा-अर्चना करून मागितले सुख-समृद्धीचे आशीर्वाद!
गडचिरोली | अहेरी | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
विठ्ठल-रुक्माई विवाह सोहळा समितीच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमानिमित्त मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम यांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल-रुक्माईचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चना केली.
यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी विठ्ठल-रुक्माईच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विठ्ठल-रुक्माईच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी विठ्ठल-रुक्माई विवाह सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
——–++ ———— ————
ज्येष्ठ कार्यकर्ते उषन्ना मेडिवार यांच्या कुटुंबीयांची राजे अम्ब्रीशराव महाराजांकडून सांत्वनपर भेट!
दुःखाच्या प्रसंगी मेडिवार कुटुंबीयांना दिला धीर; कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा दिला विश्वास
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली येथील ज्येष्ठ कार्यकर्ते उषन्ना मेडिवार (वय ५४) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मेडिवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन दुःख व्यक्त केले.
यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला. दुःखाच्या या कठीण प्रसंगी कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, असे सांगत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी, “मी तुमच्या कुटुंबासोबत आहे. कोणत्याही प्रसंगी तुम्ही एकटे नाहीत,” अशा शब्दांत आधार दिला.
त्यांच्या या सांत्वनपर भेटीमुळे दुःखात असलेल्या मेडिवार कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम तसेच मेडिवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
———- ———– ———-
*विठ्ठलेश्वर मंदिरातील कार्तिक महाप्रसादासाठी आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत!*
सिरोंचा : सिरोंचा येथील श्री विठ्ठलेश्वर मंदिरात कार्तिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमासाठी *आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम* यांनी आर्थिक मदत देऊन सहकार्याचा हात पुढे केला.
कार्तिक महिन्याच्या निमित्ताने विठ्ठलेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिरोंचा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
धार्मिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेतून *आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम* यांनी या महाप्रसाद कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्यामुळे आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणाऱ्या अशा उपक्रमांना लोकप्रतिनिधींकडून मिळणारे सहकार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
