November 7, 2026

Day: November 1, 2026

सिरोंच्यात ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना! डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची घोषणा; बहुजन समाजाच्या हक्क, न्याय आणि सन्मानासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार सिरोंचा प्रतिनिधी : संपत अंबाला दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ सिरोंचा : बहुजन समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली. दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिरोंचा येथील भगवंतराव महाविद्यालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा मादगी समाज दंडोरा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. समय्या पसूला यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा देवलमरी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार, विद्यार्थी फेडरेशन मंचिरियलचे अध्यक्ष अॅड. सुगनाकर जिल्लेपली, तेलंगणाचे जनपद गायक चिरंजीव तगरम, सिरोंचा नगरपरिषदेच्या माजी सभापती मरियम्मा आसमपल्ली, मल्लेश गुरजाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. समय्या पसूला यांनी नवीन संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. बहुजन समाजातील विविध घटकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हक्क, अधिकार आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडून लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार यांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात युवकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. तर सालय्या कंबलवार यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून बहुजन महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे आणि अॅड. सुगनाकर जिल्लेपली यांनीही मार्गदर्शन करताना कायद्याचे उल्लंघन न करता संविधानिक व लोकशाही मार्गाने सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. संपत अंबाला यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती यावेळी ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संपत अंबाला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिरोंचाचे माजी सरपंच अंकलु कालकोट यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपत अंबाला यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदनय्या जिलेपली, सत्यम आईला, संपत पुल्लुरी, मांतय्या निष्ठुरी, जक्कय्या अड्डूरी, संतोषक्का, दुर्गक्का तसेच समाजातील अनेक सुज्ञ नागरिकांनी परिश्रम घेतले. सिरोंचा येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’च्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रश्न, हक्क आणि सामाजिक न्यायासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. IMG-20261101-WA0093

सिरोंच्यात ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना! डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची घोषणा; बहुजन समाजाच्या हक्क, न्याय आणि सन्मानासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार सिरोंचा प्रतिनिधी : संपत अंबाला दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ सिरोंचा : बहुजन समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली. दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिरोंचा येथील भगवंतराव महाविद्यालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा मादगी समाज दंडोरा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. समय्या पसूला यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा देवलमरी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार, विद्यार्थी फेडरेशन मंचिरियलचे अध्यक्ष अॅड. सुगनाकर जिल्लेपली, तेलंगणाचे जनपद गायक चिरंजीव तगरम, सिरोंचा नगरपरिषदेच्या माजी सभापती मरियम्मा आसमपल्ली, मल्लेश गुरजाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. समय्या पसूला यांनी नवीन संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. बहुजन समाजातील विविध घटकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हक्क, अधिकार आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडून लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार यांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात युवकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. तर सालय्या कंबलवार यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून बहुजन महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे आणि अॅड. सुगनाकर जिल्लेपली यांनीही मार्गदर्शन करताना कायद्याचे उल्लंघन न करता संविधानिक व लोकशाही मार्गाने सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. संपत अंबाला यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती यावेळी ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संपत अंबाला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिरोंचाचे माजी सरपंच अंकलु कालकोट यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपत अंबाला यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदनय्या जिलेपली, सत्यम आईला, संपत पुल्लुरी, मांतय्या निष्ठुरी, जक्कय्या अड्डूरी, संतोषक्का, दुर्गक्का तसेच समाजातील अनेक सुज्ञ नागरिकांनी परिश्रम घेतले. सिरोंचा येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’च्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रश्न, हक्क आणि सामाजिक न्यायासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सिरोंच्यात ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना! डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची घोषणा; बहुजन...
Read More Read more about सिरोंच्यात ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना! डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची घोषणा; बहुजन समाजाच्या हक्क, न्याय आणि सन्मानासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार सिरोंचा प्रतिनिधी : संपत अंबाला दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ सिरोंचा : बहुजन समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली. दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिरोंचा येथील भगवंतराव महाविद्यालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा मादगी समाज दंडोरा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. समय्या पसूला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. समय्या पसूला यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा देवलमरी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार, विद्यार्थी फेडरेशन मंचिरियलचे अध्यक्ष अॅड. सुगनाकर जिल्लेपली, तेलंगणाचे जनपद गायक चिरंजीव तगरम, सिरोंचा नगरपरिषदेच्या माजी सभापती मरियम्मा आसमपल्ली, मल्लेश गुरजाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. समय्या पसूला यांनी नवीन संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. बहुजन समाजातील विविध घटकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हक्क, अधिकार आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडून लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रदेश युवा अध्यक्ष बबलू अक्केवार यांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात युवकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. तर सालय्या कंबलवार यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून बहुजन महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष जयराज खांडे आणि अॅड. सुगनाकर जिल्लेपली यांनीही मार्गदर्शन करताना कायद्याचे उल्लंघन न करता संविधानिक व लोकशाही मार्गाने सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. संपत अंबाला यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती यावेळी ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’ची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संपत अंबाला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिरोंचाचे माजी सरपंच अंकलु कालकोट यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपत अंबाला यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदनय्या जिलेपली, सत्यम आईला, संपत पुल्लुरी, मांतय्या निष्ठुरी, जक्कय्या अड्डूरी, संतोषक्का, दुर्गक्का तसेच समाजातील अनेक सुज्ञ नागरिकांनी परिश्रम घेतले. सिरोंचा येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय बहुजन समाज सेना’च्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रश्न, हक्क आणि सामाजिक न्यायासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.