राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात ‘रन फॉर युनिटी’चा उत्साह! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात ‘रन फॉर युनिटी’चा उत्साह! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला एटापल्ली | दि. ३१ ऑक्टोबर २०२६
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस मदत केंद्र पिपली बुर्गी येथे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धेने विशेष आकर्षण निर्माण केले.