अहेरीत वीजबिलाचा नागरिकांना ४४० व्होल्टेजचा झटका! भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अनोखे ‘झटका आंदोलन’
वीजबिलांच्या वाढत्या तक्रारींसह नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर; आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांची उपस्थिती, समस्यांवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन
गडचिरोली | अहेरी | प्रतिनिधी : के सालय्या
अहेरी : नागरिकांच्या खिशाला वाढत्या वीजबिलांचा ४४० व्होल्टेजचा झटका बसत असल्याच्या मुद्द्यावर अहेरी येथील मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखे ‘झटका आंदोलन’ करण्यात आले. पक्षाच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून नागरिकांच्य वीजबिलांसह विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात जहीर हकीम, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेविका संजना मडावी, उपसरपंच उमेश मोहरले, ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार, स्वप्नील श्रीरामवार, अप्सरभाई, रहेमान शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दोंतुलवार (सावकार), कारूशेठ रोहरा, मिलिंद अलोने, शैलेश गेडाम, सुमित मोतकुरवार, संतोष येमुलवार, राहुल दुर्गे, संदीप गुम्मलवार, रामू कस्तुरवार, शोभा मडावी, गीता दुर्गे, पुष्पा मडावी, सविताबाई, स्मिता येमुलवार, पद्मा मुन्नुरवार, पुष्पा आत्राम, विनोद रामटेके, अमोल रामटेके, दशरथ सुनतकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अधिकारी आंदोलनस्थळी दाखल; समस्यांवर सविस्तर चर्चा
आंदोलनाची दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वीजपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी वीजबिलांसह विविध नागरी समस्यांचा पाढा वाचत आपल्या मागण्या मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल मुक्कावार यांनी केले, तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार यांनी केले.
जनतेच्या प्रश्नांसाठी नेतृत्वाचे कौतुक
या आंदोलनामुळे नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली. अधिकारी वर्गाला आंदोलनस्थळी येऊन नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. विविध समस्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणल्याबद्दल भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, या आंदोलनाचे परिसरात कौतुक होत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
