एटापल्लीतील अतिक्रमण हटविताना भेदभाव नको; कमजोर घटकांना न्याय द्या!
प्रभावशालींच्या अतिक्रमणांवरही समान कारवाई करा; छोट्या दुकानदारांच्या रोजीरोटीचा विचार करण्याची CPIची मागणी
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
एटापल्ली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, या कारवाईत गरीब, सामान्य दुकानदार आणि हातगाडीधारकांवर अन्याय होऊ नये, अशी ठाम भूमिका भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (CPI) घेतली आहे. अतिक्रमण हटविताना गरीब आणि प्रभावशाली व्यक्ती असा भेदभाव न करता सर्वांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी मागणी CPIने केली आहे.
