आपुलकीचे दुसरे नाव म्हणजे भाग्यश्रीताई आत्राम! स्व. संतोष अधर सरदार यांच्या तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून सरदार परिवाराचे केले सांत्वन
दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत जपली माणुसकीची नाळ; त्यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक
मुलचेरा | प्रतिनिधी :
माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्याला आधार देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असते. आपल्या आपुलकीच्या स्वभावातून आणि संवेदनशीलतेतून माणुसकीचे नाते जपणाऱ्या भाग्यश्री ऋतराज हलगेकर (आत्राम) यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून आपुलकीचा परिचय करून दिला.
मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथे राजे धर्मराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच हायस्कूल हरिनगरचे संस्थापक स्व. संतोष अधर सरदार यांच्या तेरवी कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी त्यांनी सरदार परिवाराची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी परिवाराच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे शोकाकुल कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला.
स्व. संतोष अधर सरदार यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीसाठी दिलेले योगदान आणि संस्थात्मक उभारणीत बजावलेली भूमिका सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
केवळ पदाने नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने मने जिंकणाऱ्या भाग्यश्रीताई!
सामाजिक जीवनात माणसांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि आपुलकीने विचारपूस करणे, हीच भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्यशैलीची ओळख असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
यावेळी उपस्थितांनी स्व. संतोष अधर सरदार यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि सरदार परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
