*मुसळधार पावसामुळे आलापल्ली गावातील घरांमध्ये घुसला पाणी..!!*
*माजी पं. स. सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी केली पिडित घरांची पाहणी ..!!*
—————————————————-
अहेरी तालुक्यातील मौजा – आलापल्ली येथील वार्ड क्रमांक – ०१ आणि ०६ या दोन वार्ड मधील अनेक घरांमध्ये मुसळधार पाऊसाचा पाणी घुसलेला होता.
त्यामुळे आलापल्ली गावातील वॉर्ड क्रमांक ०१ आणि ०६ मधील अनेक नागरिकांना त्रास होत होता.
म्हणुन याबाबतची माहिती *आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सदस्य – सलीम शेख* यांनी *माजी पं. स. सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली आक्का आत्राम* यांना दिले. सदर माहिती मिळताच *माजी पं. स. – हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली आक्का आत्राम* यांनी आलापल्ली गावात येऊन, मुसळधार पावसामुळे पाणी घुसलेले घरांची पाहणी केले. त्यावेळी प्रत्येक्षात लोकांचा घरांमध्ये २ ते ३ पुटापेक्ष जास्त पाणी हे घरांमध्ये असलेला होता.
त्यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, आमचा घरांमध्ये पाणी घुसण्याचा प्रमुख कारण म्हणजे सिरोंचा पुलिया जवळ पाणी वाहणारा नाल्यावर माती टाकलेला आहे. त्यामुळे जास्त पाऊस आल्यास लवकरच आमचा घरांमध्ये पाणी घुसत आहे असे पिडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर *माजी पं. स. सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली आक्का आत्राम* यांनी *अहेरी चे तहसीलदार आणि आलापल्ली रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी* यांच्याशी चर्चा करून, नाल्यावर माती टाकलेला ठिकाणी पाहणी करण्यात आला. त्यावेळी पाहणी दरम्यान असे दिसुन आले की, खरच पाणी वाहणारा नाल्यावर माती टाकलामुळेच वाहणारा पाणी जमा होऊन लोकांचा घरांमध्ये पाणी घुसत आहे असे दिसला.
त्यानंतर *माजी पं.स.सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ. मिताली आक्का आत्राम आणि तहसीलदार अहेरी, वन परिक्षेत्र अधिकारी आलापल्ली* यांच्या उपस्थिती मध्ये नाल्यावर टाकलेला माती हे पोकलेंड चा माध्यमाने बाजुला कडून पाणी वाहण्यासाठी पुन्हा नाला बनविण्यात आला. त्या नंतर लागेतच लोकांचा घरामध्ये घुसलेला पाणी हे उतरलेला आहे.
त्यामुळे मुसळधार पावसात पाणी घुसलेले कुटुंबीय आणि आलापल्ली गावातील नागरिक हे *माजी पं. स. सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली आक्का आत्राम* यांना धन्यवाद करून, आनंदा व्यक्त केले.
यावेळी आलापल्ली ग्राम पंचायतचे प्रशासक – शंकर मेश्राम, राष्ट्रवादीचे अहेरी विधानसभा अध्यक्ष – लक्ष्मण येररावार, माजी ग्राम पं. सदस्य – सलीम शेख, माजी ग्राम पं.सदस्य – कैलास कोरेत, माजी ग्राम पं. सदस्य – वासुदेव पेद्दीवार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते – इरफान पठाण, मुन्ना भैय्या, सत्यन्न मेरगा, बालाजी गावडे, सुरज जाधव सह आलापल्ली गावातील नागरिक उपस्थित होते.
