*पेरमिली क्षेत्रातील विद्युत समस्या सोडवा..*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दिले उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन..*
प्रतिनिधी तिरुपति मडावी
—————————————————-
अहेरी तालुक्यात येणारा पेरमिली क्षेत्रातील विद्युत समस्या सोडविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी पेरमिली येथील विद्युत उपकेंद्राचे उप कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, पेरमिली येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणारे सर्व गावांमध्ये वारंवार विद्युत समस्या निर्माण होत आहे. यामध्ये क्षेत्रातील गावांमध्ये थोडासा जरी पासुन किंवा वारा आला तरी पेरमिली क्षेत्रातील अनेक गावांमधील विद्युत पुरवठा बंद होत असतो. तसेच एखादा वेळी मोठा पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे विद्युत खांबे मोडणे, तार तुटणे किंवा इतर तांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित गावातील विद्युत पुरवठा बंद होत असतो. मात्र त्यानंतर १० ते १५ दिवस उलटूनही त्या गावातील विद्युत दुरुस्तीचा काम पुर्ण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच याबाबत संबंधित गावकऱ्यांनी अनेक वेळा क्षेत्रातील विद्युत कर्मचारी यांना विद्युत बंद असल्याबाबाची माहिती देऊनही विद्युत दुरुस्तीचा काम वेळेत पूर्ण केले जात नाही. अशावेळी संबंधित विद्युत कर्मचारी गावकऱ्यांना सांगतात की, मी तुमच्या गावातील विद्युत दुरुस्तीचा काम आज करतो, उद्या करतो, काही दिवसानंतर म्हणतात की आमच्याकडे गाडी नाही, मजुर नाही अशा प्रकारचे कारणे सांगत असतात. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना अनेक दिवस अंधारातच राहावे लागत असतो. म्हणुन पेरमिली क्षेत्रातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तसेच काही विद्युत दुरुस्तीच्या कामामध्ये गावकऱ्यांकडून प्रत्येक्षात विद्युत दुरुस्तीचे काम करून घेतले जाते, मात्र गावकऱ्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला अथवा मजुरी दिली जात नसल्याच्या ही तक्रारी आहेत. अशावेळी प्रश्न निर्माण होतो की, विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही का? जर शासनाकडून विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी निधि उपलब्ध होत असेल तर त्या निधीचा वापर कुठे केला जातो? आणि जे गावकरी किंवा मजुर प्रत्येक्षात विद्युत दुरुस्तीचा काम केले आहेत त्यांना त्यांचा मेहनतीचा मोबदला का दिला जात नाही? याची सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी किंवा संबंधित कंत्राटदार यांच्यावर नियमानुसार कठोर शासकीय कार्यवाही करावे.
आणि यापुढे पेरमिली क्षेत्रातील सर्व गावांमध्ये नियमित व सुरळीत विद्युत सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. जर पेरमिली क्षेत्रातील नागरिकांना यापुढेही अशाच प्रकारे विद्युत समस्यांना सामोरे जावे लागेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्युत उपकेंद्र कार्यालय पेरमिलीत आंदोलन करण्यात येईल.
जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधित विद्युत विभागाचा प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
सोबतच याबाबतची माहिती मा. ठाणेदार साहेब, उप पोलीस स्टेशन पेरमिली यांनाही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन विद्युत उपकेंद्र पेरमिली येथील ऑफरेटर – एम. आर. बिट्टीवार यांनी स्वीकारले.
यावेळी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देतांना उपस्थित- बालाजी गावडे, जिल्हा सचिव – राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली तथा माजी सरपंच येरमनार, नागेश मडावी – अहेरी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ. बुज्जी आत्राम – उपसरपंच ग्रामपंचायत आरेंदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – अमरनाथ गावडे, लक्ष्मण मडावी, राजु आत्राम, रितेश गावडे, बाबुराव तलांडी, मुरा आत्राम, भीमराव सडमेक, चंदू तलांडी, दसा आत्राम, सोनीया वेलादी सह पेरमिली क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
