अहेरी राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची आढावा बैठक संपन्न
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन
प्रतिनिधि तिरुपति मडावी
अहेरी, दि. १ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक अहेरी येथील राजवाड्यात उत्साहात पार पडली. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी रविंद्रराव बाबा आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र भाऊ वासेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव बाबा आत्राम, प्रदेश महिला सरचिटणीस पुष्पा ताई अलोने, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका ताई गडपल्लीवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी, जिल्हा सचिव सुरेंद्र अलोने, ओलालवार, रतन दुर्गे, युवती तालुकाध्यक्ष प्रणाली दुर्गे, माजी ग्रामपंचायत सदस्य सविता सीदाम तसेच ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बेझलवार आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना रविंद्रराव बाबा आत्राम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक पातळीवर सक्रिय होण्याचे आवाहन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष रविंद्र भाऊ वासेकर यांनीही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन केले. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिला आघाडीच्या आढावा बैठका घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली. महिलांना समान हक्क व न्याय मिळण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सक्रियपणे काम करावे, तसेच महिलांच्या विविध प्रश्नांसाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीचे संचालन जिल्हा सचिव सुरेंद्र अलोने यांनी केले, तर प्रास्ताविक सारिका गडपल्लीवार यांनी केले. बैठकीस महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
