वेळेचे पालन करणारा व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होतो — डॉ. धर्मराव बाबा आत्राम
सिरोंचा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंप उद्घाटनानंतर भगवानराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला।
यावेळी आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला।
समारंभात बोलताना ते म्हणाले, “मी प्रत्येक कार्यक्रमाला वेळेत पोहोचतो. वेळेचे पालन करणारा व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होतो.”
कार्यक्रमाला भाग्यश्री ऋतुराज हलगेकर (आत्राम), ऋतुराज हलगेकर, तनुश्री आश्रम, रविंद्र वासेकर, मधुकर कोल्लुरी, बानया जनगाम, पद्मा भोगे आदी मान्यवर उपस्थित होते।
