तालुका प्रतिनिधी चामोर्शी
*कुनघाडा रै. केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप; तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण!*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) जि.प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा रै. (मुले) येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील या शाळेतील तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांनी शाळेच्या व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या या परीक्षेत कुनघाडा केंद्रशाळेतील मुलांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या घवघवीत यशामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शिक्षकांचे योग्य व सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि मुलांची कठोर मेहनत या त्रिवेणी संगमामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
शाळेचे ‘हे’ १२ हिरे चमकले:
परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. वृषभ रवींद्र कुनघाडकर
२. वेधक गजानन भांडेकर
३. आश्रय जितेंद्र वैरागडे
४. श्रीओम बाळकृष्ण मेश्राम
५. श्रेयस सचिन दूधबळे
६. सौगंध सचिन सातपुते
७. शौर्य ज्ञानेश्वर सातपुते
८. अखिल रिंगनाथ चापडे
९. आराध्य सुभाष देवोजवार
१०. अवैश मो. जावेद शेख
११. संस्कार अशोक वासेकर
१२. तेजस दिलीप टिकले
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक गुरुदास सोनटक्के यांचे सक्षम नेतृत्व, विशेष शिक्षक दिलीप खोब्रागडे, उत्तम मार्गदर्शक विजय दुधबावरे,यांच्यासह प्राथमिक शिक्षक देवाजी वन्नेवार,अंजली तंगडपल्लीवार, अनिल दुर्गे,अभिषेक लोखंडे यांचे मोलाचे .मार्गदर्शन लाभले आहे शिक्षकांनी घेतलेली अहोरात्र मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या चिकाटीच्या अभ्यासामुळेच हे यश शक्य झाले आहे.
*”आमच्या शाळेतील मुलांनी मिळवलेले हे यश ही गावाची आणि शाळेची शान आहे. शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, त्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आणि मुलांची जिद्द यामुळेच हे ऐतिहासिक यश शक्य झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!”*
— मुख्याध्यापक / शाळा व्यवस्थापन समिती, जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै.
या अभूतपूर्व यशामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर संपूर्ण परिसरातून, शिक्षण विभागातून आणि गावकऱ्यांकडून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
