📍 सिरोंचा
“शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता ओळखणाऱ्या भाग्यश्रीताई; महिलाशक्तीचा ठसा उमटवत धान गोदामाचे उद्घाटन”
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या हितासाठी पुढाकार घेणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून महिलांच्या नेतृत्वाची ताकद दाखवून दिली आहे.
रब्बी हंगामातील धान खरेदीनंतर हजारो क्विंटल धान साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक शेतकरी धान कुठे ठेवायचे, पावसापासून कसे वाचवायचे या चिंतेत होते. शेतकऱ्यांची ही व्यथा समजून घेत भाग्यश्रीताईंनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर सिरोंचा येथील शासकीय मका गोदाम शेतकऱ्यांच्या धान साठवणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
आज या धान साठवणूक गोदामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. “आमच्या धानाची आता सुरक्षित व्यवस्था झाली,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
भाग्यश्रीताई आत्राम या केवळ राजकीय नेतृत्व नसून शेतकरी, महिला व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या संवेदनशील नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत असून, “महिला ठरवली तर विकासाची दिशा बदलू शकते,” याचे उदाहरण त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
सदर उद्घाटन नायब तहसीलदार सिडाम साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परिसरातील शेतकरी, संस्थेचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावती, रंगय्यापल्ली, नारायणपूर व मेडाराम परिसरातील शेतकऱ्यांना या गोदामामुळे मोठा दिलासा मिळणार असून, योग्य बाजारभाव मिळेपर्यंत धान सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
“शेतकऱ्यांच्या मनातील वेदना ओळखून त्यांना आधार देणारे नाव म्हणजे भाग्यश्री,” अशी भावना आता जनतेमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.
