श्री भाग्यश्री ताई आञाम (हलगेकर) : मायेचा, विश्वासाचा आणि आधाराचा चेहरा
काही व्यक्ती केवळ पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर आपल्या वागणुकीने, संवेदनशीलतेने आणि लोकांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे जनमानसात विशेष स्थान निर्माण करतात. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सदस्य मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.
पक्षाचे कार्यकर्ते असोत, भगवंतराव शिक्षण संस्थेचे कर्मचारी असोत किंवा सर्वसामान्य नागरिक — कोणत्याही कुटुंबाने प्रेमाने व हक्काने आमंत्रण दिले की ताई त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी लोकांशी असलेले नाते हे राजकारणापलीकडचे असून ते माणुसकीच्या बंधनाने जोडलेले आहे.
अहेरी येथील भगवंतराव शिक्षण संस्थेचे कर्मचारी हनुमंतुजी आत्राम यांच्या सुनेच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला ताईंनी उपस्थित राहून होणाऱ्या मातेस उत्तम आरोग्य, सुखद मातृत्व आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राकेश कोडापे व वृशाली नैताम यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन नवदांपत्याला आशीर्वाद देत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी मंगल शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) हे केवळ एक नाव नाही. त्या अनेकांच्या आयुष्यातील विश्वासाचे, मायेचे आणि आधाराचे प्रतीक आहेत. रात्री असो किंवा दिवस, कोणत्याही अडचणीत एखाद्याचा फोन आला की “ताई, मला तुमची मदत हवी आहे”, एवढे शब्द ऐकताच त्या कोणताही विचार न करता मदतीचा हात पुढे करतात. म्हणूनच अनेकजण त्यांना “लाडकी बहीण”, “हक्काची ताई” आणि “कुटुंबातील सदस्य” म्हणून संबोधतात.
महान व्यक्तींनी म्हटले आहे की, स्त्री अनेक रूपांत आपल्या आयुष्यात येते — कधी बहीण, कधी सखी, कधी आई बनून ती सुख-दुःखात साथ देते. भाग्यश्रीताईंच्या व्यक्तिमत्त्वात ही सर्व रूपे पाहायला मिळतात. त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे, लोकांप्रती असलेल्या प्रेमामुळे आणि संकटसमयी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे त्या समाजातील असंख्य लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.
लोकांच्या आनंदात आनंद मानणारी, दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी आणि माणुसकीचे नाते जपणारी अशी ही नारीशक्ती म्हणजेच मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर). त्यांचे कार्य आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
