_*मागणीला यश; उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्याची मागणी….!!*_
प्रतिनिधि तिरुपती मडावी
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत इंदाराम येथे सामाजिक कार्यकर्ते *तिरुपती मडावी* यांनी केलेल्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने नाली साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मात्र, गावातील काही विकासकामे अद्यापही अपूर्ण असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी तिरुपती मडावी यांनी केली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी रस्त्यांवर मुरूम टाकण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने मुरूम टाकण्यात यावा. तसेच फुटलेले कलवट (पुलिया/क्रॉस ड्रेनेज) दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक करता यावी, तसेच पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
