_*आलापल्ली बसस्थानकात शुद्ध पाणी मशीनचे उद्घाटन; प्रवाशांना मोठा दिलासा…..!!!*_
📍आलापल्ली* तिरुपती मडावी
आलापल्ली बसस्थानक येथे प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाणी मशीनचे उद्घाटन _राष्ट्रवादी युवती जिल्हा अध्यक्ष तथा सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली_ *मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम* यांच्या हस्ते करण्यात आले. ही शुद्ध पाणी मशीन _माजी मंत्री तथा विद्यमान आमदार_ *धर्मरावबाबा आत्राम* यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे प्रवासी व बसस्थानकातील कर्मचारी यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी रामेश्वरराव बाबा आत्राम, आलापल्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर मेश्राम, माजी उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, माजी ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोणे, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, महिला तालुकाध्यक्ष सारिका ताई गडपल्लीवार, अहेरी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, मुन्ना पठाण, सुरेंद्र भाऊ अलोणे, मनोज बल्लूवार, मखमूर शेख, माजी प्राचार्य रतन दुर्गे, ताजू कुळमेथे, अहेरी आगार प्रमुख चंद्रभूषण घागरगुंडे, वाहतूक नियंत्रक अतुल रामटेके, तसेच चालक, वाहक आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत, प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा लोकहिताचा उपक्रम असल्याचे सांगितले.
