सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधीची जोरदार मागणी; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची सकारात्मक भूमिका
सिरोंचा | :- सपांदक
सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित व नव्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान तालुक्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे आमदारांचे लक्ष वेधत, रखडलेल्या विकासकामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधत आवश्यक त्या विकासकामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. सिरोंचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ नरोटे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सरपंच लक्ष्मण गावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असून, लवकरच विविध विकासकामांना निधी मिळून कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
