*मदतीचा हात ठरला जीवनदायी; तेजबाबांनी अपघातग्रस्ताच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत….!!!*
प्रतिनिधि तिरुपति मडावी
सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा आदर्श जपत *कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा* यांच्या वाढदिवसानिमित्त अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
आलापल्ली येथील रहिवासी *शंकर रामय्या येंमुलवार यांचा मुलगा रवी शंकर येंमुलवार* हा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण वाहन अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला होता. त्याच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आर्थिक मदत *माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम* यांच्या सहकार्याने *कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा* यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
शंकर येंमुलवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मुलाच्या महागड्या उपचारांचा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीत मिळालेल्या या मदतीमुळे येंमुलवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
यावेळी सलीम शेख, लक्ष्मण येर्रावार, मलय्या नासपूरवार, शाकीर शेख यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने येंमुलवार कुटुंबीयांनी *माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा* तसेच उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी गरजू अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्या या मानवतावादी उपक्रमाचे आलापल्ली व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
