सतीश बोगे यांची राष्ट्रीय अनु. जाती-जनजाती विकास परिषदेच्या सिरोंचा तालुका अध्यक्षपदी धडाकेबाज नियुक्ती; मन्नेवार समाजात आनंदाचे वातावरण!
गडचिरोली / सिरोंचा:
सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व आणि सिरोंचा नगरपंचायतीचे लोकप्रिय नगरसेवक श्री. सतीश बोगे यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या सिरोंचा तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे सिरोंचा तालुक्यातील सामाजिक आणि बहुजन चळवळीला मोठी ताकद मिळाली आहे.
सतीश बोगे यांच्या निवडीचे वृत्त समजताच संपूर्ण सिरोंचा तालुक्यासह मन्नेवार समाजबांधवांमध्ये उधाण आले आहे. समाजाच्या हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणाऱ्या एका खऱ्या कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्याने ही नियुक्ती मन्नेवार समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची मानली जात आहे.
पुष्पगुच्छ अन् शाल देऊन दणक्यात सत्कार!
या निवडीचा आनंदोत्सव साजरा करत युवा सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ मूलकाला यांनी नगरसेवक सतीश बोगे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला. बोगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनु. जाती-जमातीच्या प्रश्नांना नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी प्रसिद्ध समाजसेवक साईकिरण बोगे, श्यामराज मूलकाला आणि नवीन संगेम यांच्यासह मन्नेवार समाजातील नागरिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त तालुका अध्यक्ष सतीश बोगे यांच्यावर सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
