महिला सक्षमीकरणाच्या लढ्यात नवे नेतृत्व; ललिता शंकर चल्ला यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदाची धुरा!
प्रतिनिधी | सिरोंचा | दि. ६ ऑगस्ट
सामाजिक कार्यातील सातत्य, महिलांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सौ. ललिता शंकर चल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) महिला तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील महिला संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
पोचमपल्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी गावाच्या विकासाला गती देत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले. शासनाच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविणे, स्वावलंबनाचा संदेश देणे, सामाजिक ऐक्य निर्माण करणे आणि महिलांना संघटित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
यापूर्वी तालुका कापेवार समाज महिला अध्यक्षा म्हणूनही त्यांनी समाजहिताचे अनेक विधायक उपक्रम राबवत महिलांमध्ये नेतृत्वाची नवी ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे समाजातील महिला, युवक आणि कुटुंबांना एकत्र आणण्यात त्यांना यश मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी निष्ठेने काम केले. प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि महिलांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यामुळे त्यांनी विश्वासार्ह नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे.
याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महिला तालुका अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. ही नियुक्ती त्यांच्या निष्ठा, परिश्रम, जनसंपर्क आणि जनसेवेची योग्य पोचपावती मानली जात आहे.
हार्दिक अभिनंदन!
सौ. ललिता शंकर चल्ला यांना या नव्या जबाबदारीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महिला संघटना अधिक सक्षम होईल, महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्या अधिक प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
समस्त कापेवार समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांच्या वतीने सौ. ललिता शंकर चल्ला यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🌹💐
