रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत शाहीन ताई हकीम यांचा वाढदिवस साजरा!
अहेरी ग्रामीण रुग्णालयात फळवाटप; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
गडचिरोली प्रतिनिधी | सालय्या कंबलवार
अहेरी : वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, रुग्णांच्या वेदनेत सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा अनोखा उपक्रम राबवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय सदस्या, नागपूर विभागीय महिला अध्यक्षा, दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा अमान कन्स्ट्रक्शन अहेरीच्या संचालिका सौ. शाहीन ताई बबलुभैय्या हकीम यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत तो वाटून घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. “समाजासाठी काहीतरी देणे, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हाच खरा वाढदिवसाचा आनंद”, असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार, ग्रामपंचायत सदस्य तथा रामराम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सालय्या कंबलवार, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रहेमान शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानकुमारी कौशी, सुमित मोतकुरवार, संतोष येमुलवार, सोहेल शेख, बाबू शेख, मुडावार ताई, सुरभि राव, जयश्रीताई गोबाडे, कुमरे ताई, शैलेश गेडाम, शाहरुख शेख, मुक्तीरभैय्या, साकिरभाई, इरफान शेख, राहुल पारेलीवार, मुताहीर शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाला सामाजिकतेची जोड
शाहीन ताई हकीम यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता तो गरजूंच्या सेवेसाठी वापरण्याची प्रेरणादायी परंपरा या उपक्रमातून पुढे आली. रुग्णांना फळवाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचा क्षण साजरा करण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
वाढदिवसाचा उत्सव एका दिवसाचा असतो; मात्र सेवाभावातून दिलेला आनंद अनेकांच्या मनात दीर्घकाळ राहतो, याचा प्रत्यय शाहीन ताई हकीम यांच्या या उपक्रमातून आला.
