आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
पारंपरिक ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली; आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
आलापल्ली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
अहेरी तालुक्यातील मौजा आलापल्ली येथे पारंपरिक ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. क्रांतीवीर बाबुराव शेडमाके मुख्य चौकात समस्त आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी “आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा,” असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठित नागरिक पत्रुजी आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ईश्वर वेलादी होते. विशेष अतिथी म्हणून प्राणहिता अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार उपस्थित होते.
यावेळी सरपंच शंकर मेश्राम, डॉ. सुमती नैताम, माजी जिल्हा परिषद सदस्या लैजाताई चालूरकर, पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, अरुण सडमेक, माजी सरपंचा सुगंधाताई मडावी, पेसा महिला सदस्या मीनाताई सल्लम, डॉ. सुंदर नैताम, ग्रामपंचायत सदस्य संतोष अर्का, मायाताई कोरेत, स्वामी वेलादी, रावजी नैताम, लक्ष्मण मडावी, सत्यनारायण आत्राम, नामदेव सडमेक, विनायक अर्का, शंकर मडावी, वासुदेव आलाम, शंकर येरमे, बाबुराव कोडापे, शंकर सडमेक, रमेश मडावी, अरुण कुमरे, अशोक तोडसाम, नानाजी सोयाम, जमुना नैताम, मीराबाई सडमेक, सुमन सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-सनईच्या गजरात भव्य रॅली
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या पारंपरिक ढोल-सनई वाजंत्रीच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर भव्य रॅली काढण्यात आली. टेकडी परिसरातील गढी देवी येथे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर विविध ठिकाणी आदिवासी समाजाचा सप्तरंगी झेंडा फडकावून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे तैलचित्र व भेटवस्तू तसेच पिवळा दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर विविध सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक संस्कृती, कला आणि सामाजिक एकतेचे दर्शन या कार्यक्रमातून घडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ वेलादी, प्रास्ताविक कैलास कोरेत तर आभार राजू आत्राम यांनी मानले. वार्ताहर संजय येंमसलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सडमेक, कैलास कोरेत, योगेश कन्नाके, अक्षय मडावी, लकी सडमेक, धीरज मडावी, उमेश आत्राम, बंडू उरेत, आकाश मडावी, प्रतीक गेडाम, नागेश मेश्राम, राजू सिडाम, विनोद अर्का, वासुदेव मडावी, आर्यन कन्नाके, संदीप उरेत, सुमित मडावी, दीपक कन्नाके, गोपाल कोरेत, अल्का कोरेत, मंजुळा मडावी, चंद्रकला आत्राम, प्रेमीला मडावी, पार्वती सडमेक, दुर्गाबाई उरेत, रामबाई आलाम, लक्ष्मी आत्राम, वर्षा मडावी, पंचपुला उईके, संगीता इष्टाम, योगिता कोरेत, शिल्पा सडमेक, पूजा कोरेत आदींनी अथक परिश्रम घेतले.
जागतिक आदिवासी दिनाच्या या कार्यक्रमाला सरकारी व निमसरकारी अधिकारी-कर्मचारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला-पुरुष, युवक-युवती तसेच आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक संस्कृतीचे जतन, सामाजिक एकता आणि नव्या पिढीच्या सहभागाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला
