जीवनगट्टा जि.प. शाळेत गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप चिरंजीव कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा हर्षवर्धन आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्
एटापल्ली | तालुका प्रतिनिधी – गिरीष नरोटे
चिरंजीव कुमार भगवंतराव उर्फ तेजबाबा हर्षवर्धन आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत मौजा जीवनगट्टा येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा, जीवनगट्टा येथे आयोजित दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संभाजी हिचामी, माजी सभापती बेबीताई नरोटे, नगरसेविका शालिनीताई करमरकर, नगरसेविका सरिताताई गावडे, प्रा. डॉ. विनोद पत्तीवार सर तसेच लक्ष्मण नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास करून शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहन करण्यात आले.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून पालक व ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले.
वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
