नागपंचमीनिमित्त आलापल्लीतील नाग मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
आलापल्ली | दि. १७ ऑगस्ट २०२६ | प्रतिनिधी
नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त आलापल्ली येथील सिरोंचा रोडवरील प्रसिद्ध नाग मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागदेवतेचे दर्शन व पूजन करण्यासाठी आलापल्ली परिसरासह दूरदूरच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची धार्मिक परंपरा असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी श्रद्धेने नागदेवतेचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.
मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने, पूजेचे साहित्य, खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल लागल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने नागरिक व भाविकांची वर्दळ असल्याने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.
नागपंचमीच्या निमित्ताने आलापल्ली नगरीत नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात भाविकांनी नागदेवतेचे दर्शन घेत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
