दुःखाच्या काळात आधाराची मायेची साथ; जवेली खुर्दच्या सर्पदंश मृत मुलीच्या कुटुंबीयांना आत्राम कुटुंबीयांची मदत
गिरीश नरोटे प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील जवेली खुर्द येथे सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आत्राम कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. अंत्यसंस्कारावेळी मा. हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आदरणीय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या सूचनेनुसार मृत मुलीच्या तेरवी कार्यक्रमात शोकाकुल कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. संकटाच्या काळात गरीब व गरजू कुटुंबाच्या पाठीशी धावून जाण्याची आत्राम कुटुंबीयांची भूमिका ग्रामस्थांसाठी आधार देणारी ठरली.
दुःखाच्या प्रसंगी केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करत आत्राम कुटुंबीयांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली. ‘संकटात असलेल्या गरीबाच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी लोकसेवा’ या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
यावेळी एटापल्ली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी हिचामी, लक्ष्मण नरोटे, रैजू गावडे, अजय पदा, डॉ. विनोद पत्तीवार, जवेली खुर्दचे पोलीस पाटील उलगेजी तिमा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दुःखाच्या काळात आधाराची सावली बनून उभे राहणारे नेतृत्व आणि गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असलेली आत्राम कुटुंबीयांची सामाजिक भूमिका यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
