विवेकानंदपूर येथे फुटबॉलचा महासंग्राम!
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भव्य आंतरराज्यीय व ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
प्रतिनिधी गिरीश नरोटे
विवेकानंदपूर (ता. मुलचेरा) : ग्रामीण भागातील क्रीडापटूंना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त क्रीडा कौशल्याला चालना मिळावी आणि युवा खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, या उद्देशाने विवेकानंदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंतरराज्यीय व ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या हस्ते स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी भाग्यश्रीताई आत्राम यांनी मैदानावर उपस्थित खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींशी संवाद साधला. ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा गुणवत्ता आहे. मात्र, योग्य संधी व व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. अशा आंतरराज्यीय स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगत सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
फुटबॉलच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना नवी दिशा!
विवेकानंदपूर येथे आयोजित या स्पर्धेत विविध भागांतील संघ सहभागी झाले असून, मैदानावर होणाऱ्या चुरशीच्या सामन्यांमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. युवकांनी मोबाईल आणि व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. शाहीनताई हकीम, अध्यक्षा – नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तथा सदस्य – राष्ट्रीय कार्यकारणी समिती, राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार गट) उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित खेळाडू व क्रीडाप्रेमींना मार्गदर्शन करत ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या जिद्दीने पुढे यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवासजी विरगोनवार, माजी जि. प. सदस्य तथा सभापती युदीस्टित बिश्वास, रंजित मंडल सर, संजितजी पोद्दार, दिनोबंधू मंडल, जगदीशजी गोलदार, विष्णुजी रॉय, गौरवजी बाला, मोतीलालजी हलदार, सुभाषजी आत्राम, अपूर्वजी मुजमदार, मनोजजी कर्मकार, सुभाषजी गणपती, रहमानजी शेख, स्वप्निलभाऊ श्रीरामवार, सुमितजी मोतकूरवार यांच्यासह स्वामी विवेकानंद फुटबॉल कमिटीचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण मैदानावर रंगणार फुटबॉलचा थरार; खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष!
