एटापल्ली तालुक्यातील जिवनगट्टा येथे शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाची स्थापना
जिवनगट्टा: गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा जिवनगट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज, दिनांक २९ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी ११:०० वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शाळेची नवीन शाळा व्यवस्थापन समिती (SMC) तसेच माजी विद्यार्थी संघाची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. अमर देवानंद गावडे तर उपाध्यक्षपदी श्री. श्यामसुंदर महादेव नैताम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यासोबतच, शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘माजी विद्यार्थी संघाची’ स्थापना करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली:
अध्यक्ष: श्री. जितेंद्रजी दशरथजी टिकले
उपाध्यक्ष: श्री. देवाजी रामजी अरमा
कोषाध्यक्ष: श्री. अनिल सोमाजी करमरकर
सल्लागार सदस्य: श्री. श्रीनिवास सुधाकर कंबगोणीवार
सचिव: श्री. देवानंद बाबुराव बुद्धवार
सदस्य:
श्री. पुरुषोत्तम कोतूजी हिचामी
श्री. गिरमा रामजी हिचामी
श्री. संतोष जगन्नाथ मडावी
श्री. रमेश बाजीराव मडावी
श्री. किसान झूरुजी हिचामी
श्री. रवींद्र डोबी नरोटे
श्री. संतोष संन्यासी मडावी
श्री. शामराव बीवाजी अरमा
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले असून शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास नवनियुक्त समितीने व्यक्त केला आहे.
