ॐ श्री गणेश मंडळाला एसडीपीओ श्री समाधान पाटील यांची सदिच्छा भेट
गणरायाचे मनोभावे दर्शन; मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत उत्सवाच्या नियोजनाची घेतली माहिती
सिरोंचा | प्रतिनिधी
सिरोंचा शहरातील ॐ श्री गणेश मंडळाला सिरोंचा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. समाधान पाटील यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या आगमनामुळे मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी एसडीपीओ श्री समाधान पाटील यांनी मंडळाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती जाणून घेत उत्सव काळातील विविध उपक्रमांबाबतही त्यांनी चर्चा केली.
गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोपा जपणारा सण असल्याने उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळाला दिलेल्या या सदिच्छा भेटीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी एसडीपीओ समाधान पाटील यांच्यासोबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात छायाचित्रही काढले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय राखण्यासाठी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
