डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडून तातडीने १० हजारांची आर्थिक मदत
कारका खुर्द येथील गोटामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम कारका खुर्द येथील रहिवासी लंकेश गोटामी यांचे वडील श्री. अडवे नेवरू गोटामी यांचे कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कर्त्या व्यक्तीच्या निधनाने गोटामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्कार तसेच पुढील विधींसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता कुटुंबीयांसमोर उभी राहिली होती.
गोटामी कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद परिस्थितीची माहिती तालुका काँग्रेसचे नेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांना दिली. परिस्थितीची माहिती मिळताच डॉ. कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.
डॉ. अजय कंकडालवार यांनी प्रज्वलभाऊ नागूलवार यांच्यामार्फत गोटामी कुटुंबाला तात्काळ १० हजार रुपये (दहा हजार रुपये) रोख आर्थिक मदत पाठवली. दुःखाच्या प्रसंगी मिळालेल्या या मदतीमुळे शोकाकुल कुटुंबाला मोठा आधार मिळाला.
अडचणीच्या काळात आर्थिक मदतीचा हात देत गोरगरीब व गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका डॉ. अजय कंकडालवार यांनी यावेळी जपली. त्यांच्या या मदतीबद्दल गोटामी कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी मनापासून आभार व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर गोटा, जवेलीचे उपसरपंच दामजी हिचामी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सचिव स्वप्नील कनकलवार, दिनेश वड्डे, जवेलीच्या सरपंच अलिशा गोटा, दुलसा गावडे पाटील, कान्हालगाव पाटील मणिराम नरोटे, पेंदुलवाहीचे पाटील बंडू हिचामी, कोहकाचे उपसरपंच अंतू नरोटे, नेवरा मटामी, रोपीचे पाटील राकेश नरोटे, अण्णा गावडे, नेवसू नरोटे, नरेश गावडे, मंकू गोटामी, विठ्ठल गोटामी, मुरलीधर कुंभमवार, रमेश गोटामी यांच्यासह समस्त गावकरी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
