सामाजिक जिल्हास्तरीय विचारमंथन बैठक उत्साहात संपन्न
समाजासमोरील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन
गडचिरोली | दि. २० सप्टेंबर २०२६
गडचिरोली जिल्ह्यात समाजासमोरील विविध महत्त्वपूर्ण समस्या, सामाजिक प्रश्न तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सामाजिक जिल्हास्तरीय विचारमंथन बैठक रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली.
ही बैठक मा. आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास, युवकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम याबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली.
समाजाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे विचार करून त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी अशा विचारमंथन बैठका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या बैठकीस मा. आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शविली. त्यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
समाजाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न, संवाद आणि संघटितपणे प्रश्न मांडण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
