नगरसेवक सतीश भाऊ बोगे आणि युवा नेते कौशिक भाऊ बोगे यांची गणेश मंडळांना सदिच्छा भे
गणरायाचे दर्शन घेत मंडळांच्या व्यवस्थेची पाहणी; उत्कृष्ट आयोजनासाठी मंडळांना प्रोत्साहन
सिरोंचा : गणेशोत्सवानिमित्त सिरोंचा नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतीश भाऊ बोगे आणि युवा नेते तथा समाजसेवक कौशिक भाऊ बोगे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेत मंडळांच्या आयोजनाची पाहणी केली.
सिरोंचा शहरातील वीर मराठा गणेश मंडळ, एकता चा राजा गणेश मंडळ आणि ओम श्री गणेश मंडळांना भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. मंडळांनी केलेली आकर्षक सजावट, स्वच्छता, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त उपस्थित होते. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्सवाच्या आयोजनाची माहिती जाणून घेत विविध अडचणी आणि आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या मंडळांच्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल संबंधित गणेश मंडळांना बक्षिसे देऊन प्रोत्साहनही देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील स्वच्छता, शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. उत्सव आनंदी, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करावा, असे आवाहन कौशिक भाऊ बोगे यांनी यावेळी केली आले.
