ओम बाल गणेश मंडळावर सौगातांची बरसात; स्कूटीचा लकी ड्रॉ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
ओम बाल गणेश मंडळावर सौगातांची बरसात!
मान्यवरांच्या आर्थिक मदतीनंतर स्कूटीचा लकी ड्रॉ; नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते सोडत
सिरोंचा : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये ओम बाल गणेश मंडळाने श्री गणरायाची भक्तिभावाने स्थापना करून दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळावर अक्षरशः ‘सौगातांची बरसात’ झाली असून, विविध मान्यवरांनी मंडळाला आर्थिक मदत देत गणेशोत्सवाला पाठबळ दिले.
नगर पंचायतचे नगर उपाध्यक्ष श्री. बबलू पाशा यांच्या वतीने मंडळाला २० हजार रुपये, नगरसेवक सतीश भाऊ बोगे यांच्या वतीने ११ हजार रुपये, नगरसेवक जगदीश रांलाबड्डी यांच्या वतीने १० हजार रुपये, तर श्री तोटा राजन्ना यांच्या वतीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
दरम्यान, ओम बाल गणेश मंडळाच्या वतीने भाविकांसाठी स्कूटीचा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली.
या लकी ड्रॉमध्ये सिरोंचा शहरातील व्यंकटेश यांच्या नावाची चिठ्ठी निघाली असून, त्यांना स्कूटीचे बक्षीस मिळाले. विजेत्याचे नाव जाहीर होताच उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ओम बाल गणेश मंडळाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला भक्तीबरोबरच उत्साह, सामाजिक सहभाग आणि बक्षिसांची रंगत आली. दहा दिवसांच्या उत्सवात मंडळाला मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
ओम बाल गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, देणगीदार, भाविक आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले.
*ओम श्री गणेश मंडळ कलार वॉर्ड सिरोंचा येथे इलेक्ट्रिक्ट स्कूटी लकी ड्रॉ मध्ये वेंकटेश अंकुलु येलला यांना स्वीकृत करण्यात आले स्वीकृत करताना नगरपंचात चे उपाध्यक्ष श्री बबलु पाशा व ओम श्री गणेश मंडळ चे अध्यक्ष किरण मंडावार, तसेच जेष्ठ कार्यकर्ते श्री वेंकटस्वामी मुत्याला, श्री महेश कोंड्रा आणि श्री रामु बोंगोनी असे इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.🥳 अभिनंदन 🥳🥳
