एटापल्लीत स्वच्छतेचा संदेश; गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
संविधान चौक ते बिरसा मुंडा चौकापर्यंत स्वच्छता मोहीम; नागरिकांना स्वच्छता व सामाजिक जबाबदारीचा संदेश
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ०२ ऑक्टोबर २०२६
एटापल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी एटापल्ली येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. संविधान चौक ते बिरसा मुंडा चौकापर्यंत परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.
या अभियानात दक्षता समितीच्या अध्यक्षा तथा ‘सावित्रीच्या लेकी’च्या सदस्या सौ. सुनिताताई मोहन चांदेकर यांच्यासह शालिनीताई संतोष नैताम, विजयाताई जोंबजवार, सौ. रेहेनाताई शेख आणि वंदनाताई उपगनावार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी महिलांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.
अभियानादरम्यान रस्त्यालगतचा परिसर, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविण्यात आला. स्वच्छ परिसर हा निरोगी समाजाचा पाया असून, स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला दिलेले महत्त्व लक्षात घेता गांधी जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेला चालना देण्यात आली. स्वच्छता केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
