भामरागड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा!
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव आणि मुरूम-गुरास चक्रीवादळामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई द्या; संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची CPI व AIKS ची मागणी
भामरागड | गडचिरोली गिरीश नरोटे
भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मोठे संकट ओढवले आहे. अवकाळी पाऊस, पावसातील खंड, किडींचा प्रादुर्भाव, मुरूम चक्रीवादळाचे परिणाम तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS), गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने भामरागड तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
