सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे !मुख्यालय न राहाणारे ग्रामसेवक दिवाळीच्या सुट्टीत सतत आठ दिवस माहेरी
भोक मे जाये जनता आपणा काम बनता…!
39 ग्रामपंचायती, 17 पदे रिक्त; ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारींनी ग्रामीण प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ही आहे सिरोंचा तहसील परिस्थिती
वार्तापत्र |सपांदक सुरेश तिपट्टीवार
ग्रामिण विकास कणा माणल्याजाणार्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत सिरोंचा तालुक्यात गंभीर उपस्थित होत आहेत. तालुक्यात तब्बल ३९ ग्रामपंचायतींचा समावेश असताना ग्रामपंचायत स्तरावर पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यातच अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी, रिक्त पदांचा वाढता अनुशेष आणि एकाच अधिकाऱ्यांकडे दोन दोन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार यामुळे ग्रामीण प्रशासनाचा कारभार नेमका कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पंचायत समिती सिरोंचा येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत तब्बल १७ पदे रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रिक्त पदांमध्ये आदिमुत्तापूर, मेडाराम, गारकोपेठा, बेज्जूरपल्ली, सोमनपल्ली, पातागुडम, मादाराम, पसेवाडा, रमेशगुडम, आसारअल्ली, गुम्मलकुंडा, रामंजापूर, तुमनूर माल, मर्दीकुंटा, झिंगानूर तसेच पंचायत समिती स्तरावरील दोन पदांचा समावेश असल्याचे यादीत दिसून येते.
एकीकडे ३९ ग्रामपंचायतींचा विस्तीर्ण कारभार आणि दुसरीकडे १७ पदे रिक्त असल्यांची नोंद, यामुळे उपलब्ध अधिकारी व कर्मचान्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याचे चित्र आहे. मात्र, या रिक्त पदांचा परिणाम प्रत्यक्ष ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर किती होत आहे, याचा वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने आढावा घेणे गरजेचे आहे.
ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये नियमित उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याचे सांगितले जात आहे.
योजनांचे अर्ज, ग्रामपंचायत कर, बांधकाम परवानगी आणि इतर जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखले, घरकुल योजना, विविध शासकीय महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. दुर्गम भागातील नागरिकांना तर एका कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करूनही अधिकारी भेटत नसल्यास पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
ग्रामसेवक (मुख्यालयी अनुपस्थित)प्रमुख समस्या आणि प्रश्न
तालुक्यात एकूण ३९ ग्रामपंचायती.ग्रामपंचायत स्तरावर तब्बल १७ पदे रिक्त.अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या सतार तक्रारी.एका अधिकान्यांकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार.नागरिकांना साध्या कामांसाठी कार्यालयीन चकरा.ऑनलाईन सेवा सुरू असूनही प्रत्यक्षात कामकाजात प्रचंड अडथळे.आज शासनाचा बहुतांश कारभार ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने सुरू आहे. विविध शासकीय सेवा नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना साध्या कामांसाठीही कार्यालयीन चकरा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
