गडचिरोली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत धानोरा तालुक्यातील मौजा मोहली येथे गांजाची अवैध लागवड करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे।
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली।
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ईश्वर सखाराम पुंघाटे (वय 50, रा. मोहली ता. धानोरा) यांच्या शेतात छापा टाकण्यात आला. पंचासमक्ष झडतीदरम्यान शेतात गांजाची 91 हिरवट झाडे आढळून आली।
तपासणीत एकूण 136.25 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत 68 लाख 12 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले।
आरोपीने विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सपोनि. प्रशांत जंगले करीत आहेत।
