धर्मपुरीजवळ रेतीने भरलेला ट्रक पलटी ; मोठी जीवितहानी टळली
धर्मपुरीजवळील प्राणहिता हॉटेल समोरील पुलीयावर रेतीने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुरजागड येथून रेती घेऊन येणारा ट्रक समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वार युवकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने वाहन विरुद्ध दिशेला वळविले. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात ट्रक चालक बी. पी. सिंग यांना हात व खांद्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सदर पुलीयावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात व पुलीयाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।
