प्रतिनिधि:– जितेन्द्र दागम
*कोसंबी आग दुर्घटना; अनेक कुटुंबांचे संसार जळून खाक*
*युवा नेते तनय देशकर यांच्याकडून तातडीची मदत, पीडितांना दिलासा**
तालुक्यातील मौजा कोसंबी येथे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. दरम्यान, दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तनय देशकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन विभाग व प्रशासनाशी संपर्क साधून आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मोठी मदत केली.
आगीत पीडित झालेल्या कुटुंबांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यांच्या रोजच्या वापरातील साहित्य, कपडे, धान्य व घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन तनय देशकर यांनी पीडित कुटुंबांना भांडी, कपडे तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनी देशकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
