मौजा आंधळी येथे घरफोडी करणाया आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केली अटक
* 24 तासांच्या आत कुरखेडा पोलीसांकडून आरोपींना करण्यात आली अटक
* चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम आरोपींकडून करण्यात आले हस्तगत
गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने दि. 15 जून 2026 मौजा आंधळी येथे घरफोडी करणाया आरोपींचा शोध घेऊन 24 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई पोस्टे कुरखेडा येथील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, मौजा आंधळी येथील रहिवासी श्री. अशोककुमार वाघमारे रा. आंधळी हे दिनांक 12 जून 2026 रोजी ते दिनांक 15 जून 2026 रोजी पर्यंत घराला कुलूप लाऊन आपल्या सर्व कुटंुबासह बाहेर गावी गेले असता, या संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश करुन कपाटामध्ये असलेले नगदी 3,000/- रुपये, एक मातीचा गुल्लक ज्यामध्ये असलेले अंदाजे 7,000/- रुपये तसेच लाकडी कपाटात ठेवलेले रु. 50,000/- रुपये किंमतीचे दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप असा एकूण 60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्यावरुन पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे अप. क्र. 135/2026 कलम 331 (3), 331 (4), 305 भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावर कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे हे पोलीसांपुढे आव्हान होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोस्टे कुरखेडा येथील पोलीस पथकाने तांत्रिक पुरावे व गोपनिय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा अत्यंत शिताफिने शोध घेऊन आरोपी 1) वैभव समीर जांभूळकर, वय 29 वर्षे व 2) गणेश देविदास भैसारे, वय 33 वर्षे दोघेही रा. आंधळी ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांना दिनांक 16 जून 2026 रोजी अटक करण्यात आली होती. सदर आरोपींना मा. न्यायालयाने 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान आरोपींच्या करण्यात आलेल्या सखोल चौकशी दरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल 10 ग्रॅम सोने, रोख रक्कम असा एकूण 56,080/- रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कुरखेडा येथील मसपोनि. प्रियंका आघाव ह्रा करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेड¬ाचे प्रभारी अधिकारी पोनि. महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात मसपोनि. प्रियंका आघाव, पोहवा/मडावी, पोअं/कोरे, गुडा, चापोअं/महारे यांनी पार पाडली.
