गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या चंद्रकांत सिलामवार यांना नगराध्यक्षा श्री पद्माताई भोगे यांचा मदतीचा हात
सिरोंचा : सपांदक
समाजातील गरजू आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेल्या सिरोंचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती पद्माताई सतीश भोगे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – अजितदादा पवार गट) यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. डॉ.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पद्माताई भोगे यांनी गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या श्री. चंद्रकांत समय्या सिलामवार (वय ३६ वर्षे) यांना उपचारासाठी आर्थिक मदत देत माणुसकीचा आदर्श निर्माण केला.
सिरोंचा येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सिलामवार हे सध्या हैदराबाद येथील Apollo Hospitals, Jubilee Hills येथे Immune Thrombocytopenia (ITP) या गंभीर रक्तविकारावर उपचार घेत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत असून त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
ही बाब समजताच नगराध्यक्षा श्री पद्माताई भोगे यांनी तत्काळ पुढाकार घेत उपचारासाठी आर्थिक मदत प्रदान केली. त्यांच्या या मदतीमुळे सिलामवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
“अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे येणे हीच खरी समाजसेवा आहे,” या भावनेतून श्री.पद्माताई भोगे यांनी केलेल्या मदतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनसेवेच्या कार्याला यामुळे आणखी बळ मिळाले आहे.
यावेळी नगरसेवक सतीशभाऊ भोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, युवा नेते कौशिक भोगे, संदीप दगाम, लक्ष्मण पेद्दापेल्ली, सदाशिव दगाम, प्रवीण आणि हेमंत हे उपस्थित होते. उपस्थितांनी चंद्रकांत सिलामवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या नगराध्यक्षा पद्माताई सतीश भोगे यांच्या या कार्यामुळे सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि जनसेवेचे सुंदर उदाहरण समाजासमोर उभे राहिले आहे.
