_*राजाटोला येथील नागरिकांना पाणी व वीज सुविधा द्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे BDO यांना निवेदन….!!*_
प्रतिनिधि तिरुपती मडावी
कोरची तालुक्यातील मौजा राजाटोला (नवीन ग्रामपंचायत मसेली) येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने गटविकास अधिकारी कोरची यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाचे नेतृत्व _राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष_ *क्रांतीदादा केरामी* यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष कुमार बोगा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजाटोला येथील सुमारे २५ नागरिक गेल्या १२ ते १४ वर्षांपासून पिण्याचे पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दररोज ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी जाऊन पाणी आणावे लागत असून, वीज नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्यांची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात व राजाटोला येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी *क्रांतीदादा केरामी* यांनी, “राजाटोला येथील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पाणी व वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी राजेश एम. फाये यांना निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष क्रांतीदादा केरामी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कुमार बोगा व इतर पदाधिकारी.
