समाजसेवेने साजरा झाला युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस; सेवाभावी कार्यातून जिंकली जनमानसाची मने
“जनतेच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर वाढदिवस नव्हे, समाजासाठी काम करावं लागतं!”
आजच्या काळात वाढदिवस म्हणजे फटाके, हार-तुरे आणि मोठमोठे बॅनर अशीच ओळख झाली आहे. मात्र युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी हा पायंडा मोडत आपला वाढदिवस समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे स्वतः कार्यकर्त्यांसह बुजवून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी पुढाकार घेतला.
या समाजोपयोगी उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. “फोटोसाठी नाही, तर लोकांसाठी काम करणारा नेता” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी ऋतुराज हलगेकर म्हणाले,
“जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे. वाढदिवस हा स्वतःसाठी नसून समाजासाठी काहीतरी करण्याचा दिवस असावा.”
“लोकांच्या टाळ्या मिळवणं सोपं असतं… पण लोकांच्या मनात घर करणं फक्त सेवाभावी माणसालाच जमतं!”
या उपक्रमात नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, विजय रंगुवार, सिद्दिक अली, सुरेश कंबागोनी, एम. डी. शानू, सलाम सातार, समीर आरिगेला, इस्माईल शेख (दादाभाई), मयूर पुपलवार, संदीप गागापुरवार, विजय तोटा, सादिक भाई, संदीप घंटावर, सुजल कमलवार, राजेश बद्दी (चांटी सर), साईकुमार घंटावर, सलमान शेख, स्वप्नील तोकाला, देवया येनगंदुला तसेच ऋतुराज हलगेकर मित्र परिवार, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
