व्येंकाटरावपेठा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
प्रतिनिधी : तिरुपती मडावी
अहेरी तालुक्यातील व्येंकाटरावपेठा उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जून) पोलिओ लसीकरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या मोहिमेचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती, अहेरीचे सभापती किशोर कर्मे यांच्या हस्ते देवांशिका योगेश समुद्रालवार या चिमुकलीला पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान ANM गलबले यांनी लसीकरण मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडली. त्यांनी उपस्थित पालकांना ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस देणे अत्यंत आवश्यक असून, कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन केले.
यावेळी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
“प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी बालपण, पोलिओमुक्त भारत!” हा संदेश देत उपस्थितांनी लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
