शासकीय आदिवासी आश्रम शाळा पेरमिली येथे शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्साहात स्वागत; विद्यार्थ्यांचा सन्मान करून शिक्षणासाठी प्रेरणा
प्रतिनिधी गिरीश नरोटे
आज दि. 30 जून 2026 (मंगळवार) रोजी आदिवासी विकास विभाग, शासकीय आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, पेरमिली येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेत नव्याने दाखल झालेल्या तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, नियमित शाळेत उपस्थिती राहावी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम घ्यावेत, यासाठी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर यांच्यासह गेडाम सर, येरके सर, चिमूरकर सर, मेडी सर, शेख सर, कोल्हे मॅडम, बोरकर मॅडम, वाघाडे मॅडम, मडावी सर, मठ्ठामी सर, विडपी सर, बोरसे सर, गायकवाड सर, गेडाम सर, बगडे सर, सिडाम सर, दाजगाये सर तसेच शाळेतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, नियमित अभ्यास, स्वच्छता, संस्कार आणि उज्ज्वल करिअर याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालत त्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला.
