पाच महिन्यांची गर्भवती अजंली गुरुणुले यांनी विषप्राशन केल्याने खळबळ
रगायपल्ली येथील घटणा
रगायपल्ली येथील पाच महिन्यांची गर्भवती अजंली रामचंद्र गुरुणुले यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजंली व रामचंद्र हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी रामचंद्र यांची आई शेतीच्या कामासाठी गेली होती, तर रामचंद्र गावातच मजुरीच्या कामासाठी गेला होता. त्यावेळी अजंली आपल्या आईच्या घरी गेली होती. त्या वेळी तिची मोठी बहीणही घरी उपस्थित होती. याच दरम्यान अजंली यांनी कीटकनाशक औषध प्राशन केले.
काही वेळाने ही बाब पती रामचंद्र यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अजंली यांना रगायपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविले.
ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी अजंली यांची तपासणी केली. त्या पाच महिन्यांच्या गर्भवती असल्याने पोटातील बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना सोनोग्राफीसाठी रेफर करण्यात आले. पुढील वैद्यकीय उपचार सुरू असून आई व गर्भाच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
टीप : विषप्राशनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील चौकशी सुरू आहे.
