सिरोंचा बसस्थानकात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
सिरोंचा (प्रतिनिधी):रा.प. अहेरी आगाराच्या सिरोंचा बसस्थानक परिसरात आज वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सहभाग घेत वृक्षांची लागवड केली.
याप्रसंगी सिरोंचा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश भोगे, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक नरेश अलोणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपूरापू, संजू पेद्दापल्ली, भगवान पिल्लीवार, संदीप गंजीवार, माजी वाहतूक नियंत्रक सय्यद अकबर, वाहतूक नियंत्रक सूर्यकांत मोरे, अहेरी आगाराचे बसस्थानक प्रमुख अतुल रामटेके उपस्थित होते.
तसेच अहेरी आगारातील चालक-वाहक महादेव कोळपे, बांधुरकर, बिरबल मडावी, प्रफुल कन्नाके, विशाल येनमवार, सुरेश उईके यांच्यासह सफाई कर्मचारी रफिक शेख, सुनील, आशा मॅडम तसेच इतर मान्यवरांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
मान्यवरांच्या हस्ते बसस्थानक परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ व हरित परिसर निर्माण करणे आणि भावी पिढीसाठी अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
