*आलापल्ली ग्रा. पं. चे माजी सदस्य सलीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटात ) केली पक्ष प्रवेश!!*
————————————————
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता तथा आलापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सदस्य *श्री सलीम शेख* यांनी *महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब* यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये पक्ष प्रवेश केले आहे.
सदर पक्ष प्रवेश हे *माजी पंचायत समितीचे सदस्य मा. श्री हर्षवर्धन बाबा आत्राम* यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश झालेला आहे.
यावेळी पक्ष प्रवेश करतांना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष – श्री लक्ष्मण येररावार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता – इरफान पठाण, येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, मख्नुर भाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.