त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
दिनांक : 26/07/2026
उद्यम क्रमांक : UDYAM-MH-10-0029310
पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीतील सर्व आदिवासी समाजाकडून पेरमिली येथील नवनियुक्त ठाणेदारांचे स्वागत
अहेरी | प्रतिनिधी : तिरुपति मडावी
अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले नवनियुक्त ठाणेदार मा. पाटील साहेब यांचे पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीतील सर्व आदिवासी समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने ठाणेदार मा. पाटील साहेब यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पेरमिली परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी तसेच पोलीस-जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास पेरमिली ईलाका पारंपरिक पट्टीचे अध्यक्ष बालाजी गावडे, सचिव अमरनाथ गावडे, सहसचिव विजय आत्राम, सदस्य रितेश गावडे, वारलु तलांडी, पाटाडी पलो तसेच वासुदेव कोडापे, डोलू मडावी, बाबुराव तलांडी, दसा आत्राम, लक्ष्मण मडावी, लालु तलांडी, तुकाराम ईष्टम, रैनू गावडे, सोनिया वेलादी यांच्यासह पेरमिली ईलाका पट्टीतील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
